S M L

पवारांनी उपटले आबांचे कान, वक्तव्य निंदनीय !

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2014 03:03 PM IST

sharad pawar neeee

12 ऑक्टोबर :   राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. 'आर आर पाटील यांचं बलात्काराद्दलचं विधान निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. निवडणूक असो किंवा नसो, असं वक्तव्य करणं हे चुकीचंच आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. मनसेच्या उमेदवाराला बलात्कार करायचाच होता, तर तो निवडणुकीनंतर तरी करायचा, असं संतापजनक वक्तव्य आर आर पाटलांनी सांगली जिल्ह्यातल्या तासगाल मतदारसंघात केलं होतं.

शरद पवार यांनी मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना आपलं आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी शरद पावारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची स्तूती केली आहे.

शिवसेनेच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरेंनी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घेतली अशा शब्दात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केलं आहे. लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशात शिवसेनेचाही महत्वाचा वाटा आहे असंही शरद पवार म्हणाले.

'विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक म्हणून ही तिसरी निवडणूक लढत असल्याने ही महत्त्वाची निवडणूक आहे. आम्ही 125 ते 130 जागा लढविण्यासाठी आम्ही आग्रही होतो. पण, आता 280 जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे. आम्ही काँग्रेसकडे 50 टक्के जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने त्याआधीच आपले उमेदवारांची यादीच जाहिर करुन टाकली त्यामुळे स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असं पवारांनी सांगितलं. त्याचं बरोबर 'मी सत्तेचं आता कुठलंही पद स्वाकारणार नाही, मी फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी 'अब की बार...शरद पवार' असा नारा देत पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होतं. त्यावर पवारांनी आज अपन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं नमूद केलं आहे.

यावेळी शरद पावरांनी मोदींवरही पुन्हा एकदा लक्ष केलं. महाराष्ट्र गुजरातपेक्षा मागे आहे, असं ठसवलं जातं आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र गुजरातपेक्षा आघाडीवर आहे असं म्हणात शरद पावारांनी महाराष्ट्राची तुलना गुजरातशी करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close