S M L

बरं झालं आघाडी तुटली, स्वातंत्र्य मिळालं-चव्हाण

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2014 10:59 PM IST

cm on karad news12 ऑक्टोबर : राष्ट्रवादीबरोबर आघाडी तुटली हे बरंच झालं, आघाडी तुटल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतंय अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.  मी जास्त फाईल्सवर सह्या केल्या, पण चुकीच्या फाईल्सवर सह्या केल्या नाहीत. माझ्यावर टीका करणार्‍यांनी कोणत्या प्रकारच्या सह्या केल्या ते जाहीर करा असं आव्हानही त्यांनी राष्ट्रवादीला दिलं.

सांगली जिल्ह्यातल्या येलूरमध्ये शिराळा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. येलूरमध्ये झालेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी कोणा बरोबर ही हातमिळवणी करू शकते आघाडी तुटली बर झालं त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्या सारख वाटतंय. भाजपने गडकरी आणि फडणवीस यांचा चेहरा पुढे केला आहे पण भाजपला सत्ता मिळणार नाही म्हणून मोदींचा चेहरा पुढे केला आहे. भाजपने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच नाव गुलदस्त्यात ठेवल आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसंच त्यांनी आर.आर.पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. वादग्रस्त विधान करणार्‍या अजित पवार आणि आर.आर.पाटील यांच्यासोबत मीसाडे चार वर्ष राज्य चालवलं अशी बोचरी टीका चव्हाणांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2014 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close