S M L

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 13, 2014 10:07 AM IST

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

13 ऑक्टोबर : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत.

आघाडी आणि महायुती तुटल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी आणि पंचरंगी लढती होणार आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने कालपर्यंत मित्र असलेल्या पक्षांवर आरोप-प्रत्यारोप प्रचारात होत आहेत. आणि त्यामुळे प्रचारसभाही चांगल्याच गाजत आहेत. 1 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळं खर्‍या अर्थानं सर्वच पक्षांना प्रचारासाठी फक्त 13 दिवसच मिळाले. या काळात सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला. विविध भाषक आणि विविध राज्यांतून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांसाठी त्या-त्या राज्यातले नेते प्रचारासाठी बोलावण्यात आले होते. प्रचाराला आता अवघे काही तास उरले असताना जास्ती जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनाही चांगलीच दमछाक करावी लागली आहे.

येत्या बुधवारी म्हणजेचं 15 ऑक्टोंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 19 तारखेला राज्याचे भविष्य ठरणार आहे.

दरम्यान, आज शेवटच्या दिवशी सर्व स्टार प्रचारक प्रचाराचा धडाका लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोकणाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या आज पालघर, रत्नागिरी आणि कणकवलीत सभा होणार आहेत. तर उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. खडसेंच्या गडामध्ये ते प्रचार करणार आहेत. तसचं धुळे, मुक्ताईनगर आणि जळगाव या ठिकाणीही त्यांच्या सभा होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीची आज दुपारी बारामतीत समारोप रॅली होणार आहे. या रॅलीला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. नारायण राणे कोकणात प्रचाराचा समारोप कढणार आहेत त्याचं बरोबर मालवणमध्ये नारायण राणेंची दुपारी सभाही होणार आहे. मोदींची सभा संपल्यावर राणे ही सभा घेणार आहेत. तर राज ठाकरे आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 08:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close