S M L

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; पैशांना फुटले पाय, दारूचा महापूर !

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2014 03:30 PM IST

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; पैशांना फुटले पाय, दारूचा महापूर !

13 ऑक्टोबर : राज्यात आज शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोहचला असताना एकीकडे पैशांचा आणि दुसरीकडे दारूचा महापूर आला आहे. राज्यातून आतापर्यंत 13 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे  तर ठिकठिकाणाहून लाखो रुपयांची दारुही ताब्यात घेण्यात आली आहे. इंदापूर, पंढरपूर,अमळनेर, बुलडाणा,नागपूर,दहिसर,पंढरपूर,धुळे,डोंबिवली, पुणे, ठाणे, डहाणू, औरंगाबाद,नंदूरबार, बीड आणि परभणी या जिल्ह्यातून आतापर्यंत कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या गाड्यांच्या ताफ्यातून सर्वाधिक रक्कम जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी मुख्य पक्षांशी संबंधीत आहेत. निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात मात्र सध्या निवडणुकीच्या आधी पैसे आणि दारूच्या जोरावर निवडणुक लाढवल्या जात असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्व निवडणूक अधिकार्‍यांना मतदानापूर्वीच्या 48 तासांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहे.

ही रोकड कुणाची ?

- इंदापूर - 5 कोटी

- पंढरपूर - 1 कोटी

- अमळनेर - 1 कोटी

- बुलडाणा - 80 लाख

- नागपूर - 70 लाख

- दहिसर - 50 लाख

- पंढरपूर - 40 लाख

- धुळे - 36 लाख

- डोंबिवली - 35 लाख

- पुणे - 20 लाख 48 हजार

- डहाणू - 16 लाख 50 हजार

- फुलंब्री, औरंगाबाद - 16 लाख

- नंदूरबार - 11 लाख

- सेलू, बीड - 7 लाख

- माजलगाव, बीड - 5 लाख

- परभणी - 4 लाख 85 हजार

- तेलगाव नाका, बीड - 2 लाख

- चोपडा, जळगाव- 50 लाख

- हिंगणघाट, वर्धा- 5 लाख

- नांदगाव, नाशिक- 5 लाख

- सांगली- 5 लाख

- शिरुर, पुणे- 5 लाख

- पवई, मुंबई- 18 लाख

- नवी मुंबई- 2.5 लाख

- सोलापूर- 2.25 लाख

- खालापूर, नवी मुंबई- 40 लाख

- माजिवडा, ठाणे - 3 लाख

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close