S M L

'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? इथेच बारामतीत आहे'

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2014 11:38 AM IST

ajit pawar abad sot13 ऑक्टोबर : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? इथेच बारामतीत आहे काय गुजरातला नेऊन ठेवलाय का ?असा खोचक सवाल करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येऊन गेले बारामतीत गुलामगिरी आहे असं ते म्हणाले पण त्यांच्या या विधानाची कीव करावी अशी वाटली बारामती एवढी लोकशाही कुठंही नाही बारामती कालही आमची, आजही आमची आणि उद्याही आमची राहील असंही पवारांनी ठणकावून सांगितलं.

बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सांगता सभा झाली. पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आपल्याच बालेकिल्ल्यात ही सभा आयोजित केली होती. या सभेला शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेते उपस्थिती होते. तिघांनीही आपापल्या भाषणांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांनी तर मोदींना पूर्णवेळ संरक्षणमंत्री नियुक्त करण्याचा सल्ला दिला. तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधानांवर टीका केली. पाकिस्तानाकडून सीमेवर हल्ले होत असताना पंतप्रधान मात्र एरंडोलमध्ये प्रचारसभा करतायत यावर त्यांनी टीका केली. शिवाय गुजरातपेक्षा महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत पुढे आहे. असंही त्यांनी सांगितलं. अजित पवारांनी नरेंद्र मोदींच्या बारामती गुलामगिरीत आहे या टीकेला उत्तर देताना बारामती कालही आमची होती, आजही आमची आहे आणि उद्याही आमचीच राहील असा विश्‍वास व्यक्त केला. नरेंद्र मोदींचं एकला चलो रे असंच आहे त्यामुळे पंतप्रधान घरी कुणाला भेटत नाहीत. परदेशात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना नेलं नाही. ठरलेलं लग्न बिनसल्यामुळे मोदींना सगळं एकटं करायची सवय लागली आहे असा टोला अजित पवारांनी मोदींना लगावला. तसंच गोंध्रामध्ये काय घडलं, अमित शहांवर कुठल्या केसेस? आहे हे तपासलं पाहिजे असंही पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी आश्वासनं पाळली नाहीत. 100 दिवसांत काळा पैसा परत आणला नाही. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले नाहीत अशी सरबत्तीही पवारांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close