S M L

सोलापुरात पंचायत समिती सदस्याची हत्या

Samruddha Bhambure | Updated On: Oct 14, 2014 10:34 AM IST

सोलापुरात पंचायत समिती सदस्याची हत्या

14 ऑक्टोबर : दक्षिण सोलापूर पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांची तलवारीने हत्या करण्यात आली. सोलापूरातील कुंभारी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुनाथ कटारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीत निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर कटारे आपल्या दोन सहकार्‍यांसह रात्री 10.30च्या सुमारास शेतातल्या घराकडे परतत असताना कुंभारी-अक्कलकोट रोडवर त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

ऐन मतदानाच्या तोंडावर झालेल्या या हात्याकांडानं सोलापुरात तणावचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही तर कटारे यांच्या नातेवाईकांनी राजकीय द्वेषापोटीच गुरुनाथ कटारे यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close