S M L

पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम

Samruddha Bhambure | Updated On: Oct 14, 2014 01:47 PM IST

पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम

14 ऑक्टोबर : उल्हासनगरमध्ये 24 वर्षांपूर्वी इंदर भटिजा हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानीची जन्मठेप उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने 03 डिसेंबर 2013 रोजी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात कलानीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळत कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close