S M L

ऑटो कंपन्यांची विक्री तेजीत

1 जून सेन्सेक्स आणि निफ्टीप्रमाणेच ऑटोमोबाईल कंपन्यांचं मार्केटही वधारलेलं दिसत आहे. मे महिन्यासाठी गाड्यांच्या विक्रीची आकडेवारी आली आहे आणि यावेळी ऑटो कंपन्यांच्या विक्रीत भर पडल्याचं समजतंय. मारुती सुझुकीची विक्री 16 टक्क्यांनी वाढली आहे. मे महिन्यात मारुतीच्या 80 हजार गाड्या विकल्या गेल्या आहेत. त्यांची निर्यातही 9 हजारांपर्यंत पोचली आहे. ह्युंदाईची विक्रीही मे महिन्याच साडेआठ टक्के झाली आहे. त्यांची निर्यातही 20 हजारांनी वाढली आहे. महिंद्र अँड महिंद्रच्या ट्रॅक्टर्सची विक्रीदेखील चार हजारांनी वाढली आहे. हीरो होंडाची विक्रीही साडेबावीस टक्के वाढून पावणेचार लाख गाड्यांवर पोहचली आहे. टीव्हीएस मोटर्सची विक्री 5 टक्क्यांनी तर यापेक्षा सुमारे दुप्पट यामाहा बाईक्स मे महिन्यात विकल्या गेल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2009 12:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2009 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close