S M L

दरेकरांचा सेनेला पाठिंबा ?, मागाठाण्यात पोस्टबाजी

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2014 03:16 PM IST

दरेकरांचा सेनेला पाठिंबा ?, मागाठाण्यात पोस्टबाजी

magathane darekar14 ऑक्टोबर : मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांनी आपल्याविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी पत्रकं वाटल्याचा आरोप मनसेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी केलाय. या प्रकरणी दरेकरांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

एकीकडे मनसे आणि शिवसेना निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मागाठाणेमध्ये वेगळाच प्रकार घडलाय.'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रवीण दरेकर यांचं शिवसेनेस जाहीर समर्थन' अशा आशयाची पत्रकं मागाठणे विधानसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे. या पत्रकाच्या माध्यमातून आपला पाठिंबा प्रकाश सुर्वेंना असल्याचं भासवण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे. या मतदार संघामध्ये प्रवीण दरेकर याच नावाचे अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत असून त्या नावाचा फायदा घेत, फसवा वापर केला जात असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close