S M L

ठाणे वाढता वाढे, नवे 3 लाख मतदार वाढले !

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2014 04:59 PM IST

ठाणे वाढता वाढे, नवे 3 लाख मतदार वाढले !

thane voting14 ऑक्टोबर : सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे ठाणे. त्यामुळे ठाण्यात मतदानाची टक्केवारी किती असणार हे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर 3 लाख मतदार वाढले आहेत. लोकसभेनंतर झालेल्या मतदार नोंदणीनंतर ही संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघात मतदानादरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून 248 मतदान केंद्रांत व्हिडिओ चित्रिकरण, तर 516 केंद्रांत सुक्ष्म निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील याद्यांचा घोळ या वेळेस होणार नसल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे.

31 जानेवारी 2014 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये 55 लाख 12 हजार 842 मतदार होते. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी यामध्ये 1 लाख 77 हजार 386 मतदारांची वाढ होऊन मतदारांची संख्या 56 लाख 90 हजार 228 पर्यंत पोहचली होती. त्यानंतर झालेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे ही संख्या 59 लाख 90 हजार 767 झाल्याने मतदारांच्या संख्येत 3 लाख 539 ची वाढ झाली आहे.

यामध्ये 32 लाख 92 हजार 504 पुरूष तर 26 लाख 93 हजार 131 महिला मतदार असून 132 इतर मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये 7 हजार 404 हे टपाल मतदार असून 1 हजार 355 सैनिक मतदार असल्याचं जिल्हाधिकारी वेलारसू यांनी सांगितलंय. मतदानादरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून 248 मतदान केंत व्हिडिओ चित्रिकरण तर 516 सुक्ष्म निरिक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. तर,मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्राच्या संख्येतही 102 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघात 75 टक्के मतदार छायाचित्र पूर्ण झाले असून उर्वरित 25 टक्क्यांसाठी वोटर्स सर्च फसिलिटी सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार जिल्ह्यामध्ये 764 मतदान केंद्र संवेदनशील असून कळवा-मुंब्रा-17,उल्हासनगर-22,अंबरनाथ-17k< आणि कल्याण पश्चिम-17 या चार मतदारसंघात 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने येथे दोन मतदान यंत्रेआहेत. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसले तरी इतर 11 पुरावे दाखवून मतदान करता येणार आहे. या निवडणुकीसाठी 35 हजार 443 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती पी वेलारासु यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून तब्बल 1 कोटींची रोकड हस्तगत केली आहे. ऐरोली मतदारसंघात 1 लाख 32 हजार, कोपरी-पांचपाखाडीत 48 लाख 29 हजार, भिवंडी पूर्व मतदारसंघात 1 लाख 87 हजार, बेलापूर मतदारसंघात 5 लाख 7 हजार, कल्याण ग्रामीणमध्ये 19 लाख 69 हजार तर ठाणे शहर मतदारसंघात तीन लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही रोकड योग्य पुरावे तपासून पुन्हा संबंधिताच्या हवाली केली जाते. सापडलेल्या रक्कमेचा योग्य हिशेब न दिल्यास अशा प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली जाते.अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close