S M L

सिंधुदुर्गात अज्ञात व्यक्तींनी सात गाड्या जाळल्या

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2014 05:36 PM IST

सिंधुदुर्गात अज्ञात व्यक्तींनी सात गाड्या जाळल्या

sawantwadi14 ऑक्टोबर : सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये सहा मोटरसायकल जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आज पहाटे ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक, पुण्यात वाहनं जाळ्याची घटना घटल्या होत्यात याचं लोण आता सिंधुदुर्गातही पसरलंय. सावंतवाडीमध्ये काँग्रेस तालुकाअध्यक्ष संजय परब यांच्या मोटारसाईकलीसह ते ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीतल्या अन्य चार रहिवाशांच्या मोटरसायकलींचा त्यात समावेश आहे.

तर काँग्रेस कार्यालयासमोरचीही एक मोटर सायकल जाळण्यात आली आहे. मतदानाच्या एक दिवशीआधी ही घटना घडल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close