S M L

जाहिरातींवरून सेना-भाजपमध्ये जुंपली, आयोगाकडे तक्रार

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2014 08:18 PM IST

जाहिरातींवरून सेना-भाजपमध्ये जुंपली, आयोगाकडे तक्रार

ravte on add14 ऑक्टोबर : प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी शिवसेनेनं आता जाहिरातीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, आर.आर. पाटील, देवेंद्र फडणवीस,विनोद तावडे आणि आशिष शेलार यांच्या जाहिरातींवर आक्षेप सेनेनं आक्षेप घेतला. हे सर्व उमेदवार अपात्र असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आज शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या जाहिरातींवर शिवसेनेनं आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. या जाहिरातींचा खर्च व्यक्तिगत मोजावाआणि हा खर्च मर्यादेपेक्षा जास्त निघाला तर त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केलीय. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, आर.आर. पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, आशिष शेलार यांच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला आहे. हे सगळे उमेदवार अपात्र आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही सगळ्या कागदपत्रांची खात्ररजमा केली असून आयोगाच्या अधिकार्‍यांना संपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मागणीही रावतेंनी केली. रावते यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय. दरम्यान, दिवाकर रावतेंच्या या आरोपाला भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर दिलंय. शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे अशी टीका करत आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढलं पाहिजे पण ते आमच्यावरच आरोप करत आहे . शिवसेनेनं आपला पराभव आधीच मान्य केलाय, असं प्रत्युत्तर रुडी यांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2014 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close