S M L

मतदान करा...पाठवा फोटो,व्हिडिओ आणि व्हा मतनायक !

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2014 08:35 AM IST

मतदान करा...पाठवा फोटो,व्हिडिओ आणि व्हा मतनायक !

ibnl_vote self15 ऑक्टोबर : आज लोकशाहीचा उत्सव...मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस...विधानसभा निवडणुकीसाठी उद्या राज्यात मतदान होत आहे. उद्या सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. पण नेहमी प्रमाणे अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून 'एंजॉय' करतात तर काही जण 'सिस्टिम'ला कंटाळून मतदान करण्यासाठी टाळाटाळ करता. पण गरज आहे मतदानाची...आपल्या हक्काचं सरकार स्थापन करण्याची...त्यामुळे लोकहो मतदान करा...आम्ही करतोय आवाहन मतदान करण्याचं...तुम्ही मतदान करा...तुमच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींना मतदान करण्याचं आवाहन करा...मतदान केंद्रावर अथवा मतदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीय,मित्रांसोबत मतदानाचं आवाहन करणारा 1 मिनिटभराचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा 9167678594 या नंबर... आम्ही दाखवू आयबीएन लोकमतवर...तुम्ही ठरणार आयबीएन लोकमतचे मतनायक...

मतनायक होण्यासाठी काय करायचं ?

1) तुम्ही मतदान कराच आणि तुमच्या कुटुंबीय, मित्रांना मतदानाचं आवाहन करा

2) यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत अथवा मित्रांसोबत मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावर तुमच्या मोबाईलमध्ये मिनिटभराचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा

3) रेकॉर्ड झालेला व्हिडिओ तुमचं नाव, गाव आणि ठिकाणासह आम्हाला पाठवा 9167678594 या नंबर

4) तुम्ही मतदानाचे सेल्फी फोटोही पाठवू शकता आम्ही प्रसिद्ध करून आमच्या वेबसाईटवर

5) फोटो तुम्ही या नंबरवरही पाठवू शकता अथवा टिवट्‌र @ibnlokmattv वर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2014 07:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close