S M L

ऑस्ट्रेलियात एका टॅक्सी ड्रायव्हरवर झाला हल्ला : भारतीयांवरच्या हल्ल्यात वाढ

1 जून, ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले सुरूच आहेत. नुकताच एका टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला झाला. गुन्हेगारांना योग्य शिक्षा देऊ, असं आश्वासन ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिलं त्याच दिवशी हा हल्ला झाला. दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने मारहाण केल्याचं या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं. हल्ल्यात ड्रायव्हरच्या तोंडाला जबर मार लागला आहे. तसंच त्याचे दोन दातही पडले आहेत. हा टॅक्सी ड्रायव्हर मूळचा हैदराबादचा आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान केव्हिन रूड यांनी भारतीयांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध केला होता. आणि त्यांना सर्व ती सुरक्षा पुरवण्याचे आश्‍वासन दिलं होतं. भारतीयांवर झालेला गेल्या चार आठवड्यांतला हा पाचवा हल्ला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीजेपीचे आमदार मंगल लोढा यांनी आस्ट्रेलियन कौन्स्युलेटला एक निवेदन सादर केलं. भारतातील जवळ जवळ 75हजार विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकतात, त्यांच्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलियन सरकार काय सुरक्षा व्यवस्था करणार ? आणि भविष्यात या विद्यार्थावर हल्ले होऊ नये म्हणून यापुढे सरकार काय करणार ? याची विचारणा या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन कॉन्स्युलेटने यावर काहीही उत्तर दिलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2009 04:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2009 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close