S M L

मी कसाबसोबत होतो - फहीम अन्सारीची कबुली

2 जून 26/11 च्या हल्ल्यात कसाबसोबत अटकेत असणारा दुसरा आरोपी फहीम अन्सारी याने आपल्या गुन्ह्याची मी हल्ल्यात कसाबसोबत होतो, अशा शब्दात दिली आहे. फहीम अन्सारी याच्या या कबुलीने 26/11 च्या खटल्याचा आरोपींचा गुंता सोडवायला मदत होणार आहे. आर्थररोड जेलच्या विशेष न्यायालयात 26/11 च्या खटल्याच्या सुनावणीच्या सत्रात सध्या साक्षीदारांच्या साक्षी सुरू आहेत. आज आर्थररोड जेलच्या विशेष न्यायालयात राजेंद्र बोरसे यांची साक्ष झाली. या साक्षीत राजेंद्र बोरसे यांनी फहीमला ओळखलं. राजेंद्र बोरसे यांची काकी काशीबाई बोरसे यांच्या घरी फहीम अन्सारी दोन वर्षांपासून भाड्याने राहात होता. त्यावेळी फहीमने स्वत:चं नाव साहील पावस्कर असं सांगितलं होतं. आज राजेंद्र बोरसे यांनी फहीम त्यांच्याकडे कोणत्या दलालामार्फत आला, त्याने काय व्यवहार केला, किती पैशांचा व्यवहार झाला होता अशी साक्ष राजेंद्र बोरसे यांनी दिली. ही साक्ष ऐकून फहीम अन्सारीला न्यायमूर्ती ताहिलियांनी यांनी विचारलं की, राजेंद्र बोरसे सांगत आहेत ते खरं आहे का, तर फहीम याने ' होकार ' दिला. फहीमचा होकार म्हणजे त्याचा 26/11 च्या हल्ल्यात असणा-या सहभागाची कबुलीच म्हणावी लागेल. मुंबईत जे 10 आरोपी समुद्री मार्गाने आले होते त्यांच्यातल्या अबू इस्माईलकडे जो नकाशा सापडला होता, तो फहीमने तयार केल्याचा पोलिसांचा संशय होता. फहीमने कसाब आणि त्याच्या साथीदारांना 26/11च्या कटासंदर्भात मदतही केली होती. हल्ल्याचा कट काही दिवस आधी रचला गेला. हल्ल्याच्या काही महिने आधी फहीमने मुदतीच्या आधीच काशीबाई बोरसे यांचं घर सोडलं होतं. त्यावेळी फहीमने काशीबाई बोरसे यांना देऊ केलेले डिपॉझिटचे पैसे आणि आगाऊ भाडंही परत घेतलं नव्हतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2009 09:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2009 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close