S M L

गडचिरोलीत 15 किलो स्फोटकं जप्त

Samruddha Bhambure | Updated On: Oct 16, 2014 01:58 PM IST

गडचिरोलीत 15 किलो स्फोटकं जप्त

gadchiroli 44

16 ऑक्टोबर :  गडचिरोलीमधल्या निवडणुकीवर माओवाद्यांचं सावट आहे. काल दिवसभरात निवडणूक पथकावर माओवाद्यांनी दोन हल्ले केले.  त्यानंतर आजही गडचिरोलीत दोन ठिकाणी भूसुरुंग स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. गडचिरोलीत सर्च ऑपरेशन दरम्यान पेंड्री आणि फुलगोडी कट्टा या दोन ठिकाणी ही भुसुरुंग स्फोटकं सापडली आहेत. ही स्फोटकं इतकी शक्तीशाली आहेत की एक बस उडवून देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. तब्बल दहा ते पंधरा किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

राज्यात काल (बुधवारी) विधानसभा निवडणूकीचं मतदान पार पडलं. गडचिरोली जिल्ह्यासारख्या अतिसंवेदनशील भागातही मतदान शांततेत पार पडलं. पण आता सुरक्षा दलांसमोर आव्हान आहे ते सर्व मतदानयंत्र सुरक्षितपणे मुख्यालयात पोहोचवण्याचं. जिल्ह्यातल्या दुर्गम भागातून 50 पेक्षा जास्त निवडणूक पथकं आता मुख्यालयाकडे निघाली आहेत. माओवाद्यांच्या हल्ल्याची भीती असल्यानं सुरक्षादलानं सर्व काळजी घेतली आहे. निवडणूक अधिकार्‍यांची टीम पुढं जात असताना सर्व रस्ता आधी स्पेशल स्कॉड कडून तपासला जातोय आणि त्यानंतरच ही टीम पुढ जात आहे.

गडचिरोलीमध्ये मतदान घेणं हे आव्हान असतं, मात्र कुठल्याही धमक्यांना न घाबरता, बाहेर पडून आदिवासी बांधवांनी आपला लोकशाहीवरचा विश्वास सिध्द केला. इथं बुलेटची नाही तर बॅलेटची सत्ता चालत,े हे गडचिरोलीतल्या आदीवासींनी जगाला दाखवून दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2014 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close