S M L

...तर भाजपला लागेल राष्ट्रवादीची साथ ?

Sachin Salve | Updated On: Oct 16, 2014 06:55 PM IST

...तर भाजपला लागेल राष्ट्रवादीची साथ ?

16 ऑक्टोबर : विधानसभेसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. मात्र मतदाराजाने कौल कुणाला दिला ?, कुणाचे सरकार येणार ? याची चर्चा आता सुरू झालीय. वेगवेगळ्या एक्झिटपोलमधून निकालाअंती भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढं येईल असं दिसतंय. पण जर भाजपला बहुमताचा आकडा म्हणजेच 145 ची मॅजिक फिगर गाठता आली नाही आणि शिवसेनेनं भाजप बरोबर युती करण्यास नकार दिला तर भाजप राष्ट्रवादी बरोबर आघाडी करू शकते अशी चर्चा पुन्हा नव्याने सुरू झालीय.

राष्ट्रवादी - भाजप एकत्र येतील का ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भाजपसोबत घेण्यासाठी युती तोडली असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. एवढेच नाहीतर शरद पवारांना युतीसोबत घेण्याचे प्रयत्न झाले होते पण आम्ही त्यांना विरोध केला होता असा खुलासाही उद्धव यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला होता. उद्धव यांच्या आरोपांमुळे पवार भाजपमध्ये जातील का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली होती. लोकसभेतही अशी चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवारांनीच याचं खंडन केलं होतं. आताही शरद पवारांनी याला स्पष्टपणे नकार दिला. उलट राष्ट्रवादीचे सर्वच नेत्यांनी भाजप आणि मोदींना धारेवर धरत जोरदार टीका केली होती. भाजपनेही याला सडेतोड उत्तर दिलं. भाजपच्या नेत्यांनी ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असा खुलासा केला. पण वेगवेगळ्या एक्झिटपोलमधून भाजप पहिल्या क्रमांकावर, शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर आणि राष्ट्रवादी तिसर्‍या तिसर्‍या क्रमांकावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेनं भाजपसोबत युतीसाठी नकार दिला तर भाजपला राष्ट्रवादीशी बोलणी करावी लागले. आता पर्यंतचा नकार सत्तेसाठी होकारही ठरू शकतो. पण सत्तेच्या सारीपाटावर कधी काय घडू शकत याचा नेम नाही म्हणून निकालात जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर सत्तास्थापनेसाठी कोणी तरी कुणाची मदत घेणार हे स्पष्ट आहे. आता भाजप शिवसेना एकत्र येते की भाजप राष्ट्रवादी एकत्र येते हे पाहण्याचं ठरेल.

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच ?

'देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र' अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी देताच देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रकाशझोतात आलं. फडणवीस यांचं नाव येताच शिवसेनेनं लगोलग उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं. पण हाच वाद कायम राहिला आणि अखेरीस जागावाटपाच्या तिढा आणि मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली. युती तुटली जरी असली भाजपमध्ये मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरूच होती. एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तर नितीन गडकरी पुन्हा राज्यात परतील अशी चर्चाही रंगली. मात्र गडकरींनी आपण दिल्लीतच खुश आहोत असं सांगून मोकळे झाले. पण गडकरी हे संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतले नेते आहे. त्यामुळे संघाचा जर आदेश आला तर गडकरींचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येऊ शकतं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मर्जीतले नेते असल्याचं मानलं जातं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर फडणवीस यांनीच पुढची कमान सांभाळली. त्यामुळे आपोआप फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी वर्णी लागलं. त्यामुळेच फडणवीस आणि गडकरी दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार मानले जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2014 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close