S M L

बारावीचा निकाल जाहीर : राज्यात मुलींनी मारली बाजी

4 जून 2008-09मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला राज्यभरातून 11 लाख 84 हजार 226 विद्यार्थी बसले होते. यापैकी 6 लाख 90 हजार 139 मुलं आहेत. तर 4 लाख 94 हजार 87 मुली आहेत. बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात मुलींनी बाजी मारली आहे. नाशिकमधून मुलींमध्ये युगंधरा घोडेगावकर ही मुलगी नाशिक विभागात पहिली आहे. युगंधरा ही मालेगावच्या एम.एस.जी. आर्ट्स अँड सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला 96 टक्के गुण आहेत. तर श्रुती सोनवणे ही 95.67 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये राज्यात दुसरी आली आहे.श्रुती ही नाशिकच्या एच.पी.टी. आर.वाय.के कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तर वाणिज्य शाखेमध्ये कपिल आफळे हा नाशिकच्या बी.वाय.के कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला 91.57 टक्के गुण आहेत. धुळ्यातून विज्ञान शाखेत सनिरा वाघमारे ही जुलाल पाटील कॉलेजची विद्यार्थिनी पहिली आली आहे. तिला 92.83 टक्के गुण आहेत. विज्ञान शाखेतून राज्यात मुंबईच्या चेंबूर कॉलेजचा मुलगा अंकीत शहा 95 टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. कला शाखेतून भाग्येश्री देसाई ही विद्यार्थिनी परभणीच्या ज्ञानेश्वर मिहिला कॉलेजची 92.83 टक्के गुण मिळवून पहिली आहे. तर भाग्यश्री पटवर्धन ही पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजची विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत 93 टक्के गुण मिळवून राज्यात पहिली आली आहे. आणिरात्रशाळेतून नफिसा अंजूम अलिमुद्दीन ही मुलगी 82.33 टक्के गुण मिळवून राज्यातून पहिली आली आहे. राज्यभरातून 11 लाख 84 हजार 226 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. नाशिक विभागाचा निकाल 85 टक्के लागला आहे. तर नाशिक जिल्ह्याचा निकाल 81.54 टक्के लागला आहे. धुळे जिल्ह्याचा 79.68 टक्के, जळगाव जिल्ह्याचा 84.43 टक्के, नंदुरबार जिल्ह्याचा 92.67 टक्के, पुण्याचा 81.85 टक्के, औरंगाबाद विभागाचा 78.42 टक्के, अमरावतीचा 75.93 टक्के, तर नागपूरचा 82.57 टक्के लागला आहे. 12 वीच्या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना http://maharesult.nic.in, http://www.rediff.com , http://www.zoneyuva.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे. तसंच www.msbshse.ac.in आणि www.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर वैयक्तिक निकालाशिवाय संपूर्ण राज्याचा केंद्रनिहाय तसंच विभागनिहाय निकाल पाहता येईल.महाराष्ट्र राज्य विभागीय टक्केवारीपुणे विभाग - 85.09 टक्केनागपूर विभाग - 78.75 टक्केऔरंगाबाद विभाग - 81.51 टक्के मुंबई विभाग - 78.19 टक्केकोल्हापूर विभाग - 84.95 टक्केअमरावती विभाग - 79.94 टक्केनाशिक विभाग - 85.03 टक्केलातूर विभाग - 85.56 टक्के राज्यात 85.19 टक्के मुलींना बाजी मारली.79.40 टक्के मुलं यशस्वी झालीत. पहिल्या तिनही मुलीचं यशस्वी झाल्यात.राज्यात पहिले आलेले विद्यार्थीविज्ञान शाखा - अंकीत शहा,चेंबूर मुंबई - 95 टक्के कला शाखा - भाग्येश्री देसाई, परभणी-ज्ञानेश्वर महिला कॉलेज - 92.83 टक्केवाणिज्य शाखा- भाग्यश्री पटवर्धन, पुणे, बीएमसीसी कॉलेज - 93 टक्केरात्रशाळा- नफिसा अंजूम अलिमुद्दीन - 82.33 टक्के

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2009 02:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2009 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close