S M L

'त्या' विधानाबाबत दिलगिरी -पृथ्वीराज चव्हाण

Samruddha Bhambure | Updated On: Oct 17, 2014 02:36 PM IST

prithviraj-chavan466

17 ऑक्टोबर : आदर्श घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई केली असती तर काँग्रेसमध्ये फूट पडली असती, असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. या मुलाखतीनंतर आता काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला असून पक्षातले ज्येष्ठ नेतेही चव्हणांवर नाराज झाले आहेत. आदर्श घोटाळ्याबाबत आपण काँग्रेस नेत्यांवर जी काही टीका केली होती ती मुलाखतीनंतर अनौपचारिक गप्पांच्या ओघात केली होती, असं सांगतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीमधील वादग्रस्त विधानांबाबत गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.

आदर्श घोटाळ्याशी संबंधित नेत्यांवरील टिप्पणी ही मुलाखतीनंतर अनौपचारिक गप्पा सुरू असताना केली होती. गप्पांच्या ओघात मी टिप्पणी केली. मात्र त्यालाच प्रसिद्धी देण्यात आली. त्यात मी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती त्याबाबतही मी दिलगिरी व्यक्त करतो. मी गप्पांमध्ये जी विधाने केली ती अनावधनाने केली, ती चूकच होती, असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close