S M L

सेनेचा एक्झिट पोल, आमचाच पक्ष सर्वात मोठा ठरेल ?

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2014 09:38 PM IST

shivsena uddhav17 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल देण्यात आलाय. तर शिवसेना दुसर्‍या स्थानावर असणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पण शिवसेनेनं आपल्या मतदार संघातील आढावा घेतला. त्यात शिवसेनेला 95 च्या आसपास जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये. एवढंच नाहीतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरेल असंही सांगण्यात आलंय.

गेल्या 25 वर्षांचा शिवसेना आणि भाजपचा संसार मोडला आणि दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीही संपुष्टात आली. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पंचरंगी ठरली. भाजपने लोकसभेच्या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदींनी साथ देण्याचं आवाहन केलं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर प्रचाराचा धडाका लावला आणि युती तुटल्याच्या खापर भाजपवर फोडलं. 13 दिवस चाललेल्या वाक्य युद्धानंतर बुधवारी मतदारांनी आपला कौल ईव्हीएम मशीनमध्ये नोंदवला. मत प्रक्रिया संपल्यानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर टुडेज चाणक्य एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने एक्झिट पोल फसवे असल्याचं सांगत आहे. त्यामुळेच मतदानानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या जागांचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. विविध एक्झिट पोलमध्ये जागांची स्थिती जाहीर झाली तरी प्रत्येक पक्ष आपल्या सूत्रांमार्फतही माहिती घेतोय. शिवसेनेमध्ये गेली दोन दिवस राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. त्यात शिवसेनेला 95 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. निकालानंतर शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केलाय.

चाणक्य एक्झिट पोल

 

पक्ष

2009

2014 (अंदाजे)

भाजप

46

151(उणे/अधिक 9)

शिवसेना

44

71(उणे/अधिक 9)

काँग्रेस

82

27 (उणे/अधिक 5)

राष्ट्रवादी काँग्रेस

62

28 (उणे/अधिक 5)

मनसे आणि इतर

54

11 (उणे/अधिक 5)

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close