S M L

भाईंदरमध्ये शेकडो बनावट पॅनकार्ड सापडले

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2014 05:59 PM IST

भाईंदरमध्ये शेकडो बनावट पॅनकार्ड सापडले

bhaindar_pancard17 ऑक्टोबर : मुंबईजवळच्या भाईंदरमधल्या राई गावात राई पुलाच्या खाली शेकडो बनावट पॅनकार्ड आढळून आले आहेत. पाण्यात वाहून जाण्यापूर्वी रहिवाशांनी ती पोलिसांकडे जमा केली. नाल्याजवळ पडलेले हे पॅनकार्डस् निवडणुकीत बोगस मतदान करण्यासाठी तर वापरण्यात आले नाही ना, असा संशय निर्माण झालाय.

सुरुवातीला भाईंदर पोलिसांनी पॅनकार्ड्स सापडले, हेच मान्य केलं नाही. पण, जेव्हा फुटेज दाखवलं तेव्हा त्यांनी 500 हून जास्त बनावट पॅनकार्ड सापडल्याचं कबूल केलं. इतकी गंभीर घटना असूनही पोलिसांनी अजूनही कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

परंतु हे कोण्या राजकीय पक्षांचे षडयंत्र असू शकते, निवडणूक हरल्यावर या मुद्द्याच्या आधारे फेर निवडणूकची मागणी करू शकतील अशी भीती व्यक्त होतं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close