S M L

आमिरनंतर आता अनुष्का ट्रान्झिस्टरसोबत...!

Samruddha Bhambure | Updated On: Oct 17, 2014 04:58 PM IST

आमिरनंतर आता अनुष्का ट्रान्झिस्टरसोबत...!

17 ऑक्टोबर : 2014 चा बहुचर्चित सिनेमा 'पीके'चं चौथं पोस्टर काल (गुरुवारी) लाँच करण्यात आलं. पण यावेळेस यात फक्त आमिर खान नसून त्याच्यासोबत अनुष्का शर्माही आहे. राजकुमार हिराणी यांच्या 'पीके' या आगामी सिनेमाचे चौथे पोस्टर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काने लाँच केलं आहे.

आमिर खानच्या पहिल्या पीकेच्या पोस्टरमध्ये तो 'फक्त' ट्रान्झिस्टरसोबत होता. अनुष्का आपल्या चाहत्यांना मी ही पीकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरसोबतचं दिसणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरसोबत दिसत आहे. हे एक मोशन पोस्टर आहे, त्यामध्ये अनुष्काचे अनेक लुक्स दाखवण्यात आले आहेत.

'पीके' 19 डिसेंबरला रिलीज होत आहे. आमिर खान, संजय दत्त आणि अनुष्का शर्मा या व्यतिरिक्त सुशांत सिंह राजपुत सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close