S M L

विंडीज खेळाडूंचं बंड, दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतणार

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2014 06:29 PM IST

विंडीज खेळाडूंचं बंड, दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतणार

17 ऑक्टोबर : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणार्‍या वन डे मालिकेत विघ्न आलंय. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मानधनावरून बंड पुकारले असून पाचवी वन डे, एक टी-20 आणि 3 टेस्ट्स न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीजचे 5 खेळाडू मायदेशी परतणार आहे. विंडिजच्या खेळाडूंच्या या निर्णयामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केलीये.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड डब्ल्यूआईसीबीने भारताचा दौरा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली चौथी वन डे संपल्यानंतर मायदेशी परतणार आहे. वेस्ट इंडिजच्या टीमनं उरलेली पाचवी वनडे, एक टी-20 आणि 3 टेस्ट्स खेळायला नकार दिलाय. मानधनाच्या मुद्द्यावरून वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या दौर्‍यावर या वादाचं पहिल्यापासून सावट होतं. हा वाद न सुटल्यामुळे अखेर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी उरलेल्या मॅचेस न खेळण्याचा निर्णय घेतला. पाचवी आणि शेवटची वनडे कोलकात्यामध्ये होणार होती. विंडीजच्या या निर्णयावर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी आश्चर्य वक्त केलंय.

भारताचा उरलेला दौरा अर्धवट सोडण्याचा डब्ल्यूआईसीबीचा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक आहे यामुळे विंडीजसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली. या वादाची सुरुवात झाली ती धर्मशाला वन डे मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर. टॉस जिंकल्यानंतर सर्व खेळाडू कर्णधार ड्वायन ब्राओसोबत एकत्र जमले होते. ब्राओने स्पष्ट केलं की, मी आणि पूर्ण टीम एकत्र आहे. हा दौरा आमच्यासाठी खराब राहिला आहे. आमच्या चाहत्यांमध्ये याबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये पण आम्हाला निर्णय घ्यावा लागलाय. जे खेळाडू यासाठी लढा देत आहे त्यांचं मी अभिनंदन करतो असंही ब्राओ म्हणाला. त्यानंतर 5 खेळाडूंनी वन डे सीरीज अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीसीसीआयने विंडीजच्या जागी श्रीलंकेच्या टीमला निमंत्रण दिलं आहे. श्रीलंकन टीमनेही खेळणार असल्याची ग्वाही दिली आहे. ही सीरीज 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close