S M L

आता वसईत 150हून अधिक मतदान ओळखपत्र सापडली

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2014 06:44 PM IST

आता वसईत 150हून अधिक मतदान ओळखपत्र सापडली

17 ऑक्टोबर : मुंबईजवळील भाईंदर येथे 500 हून अधिक पॅनकार्ड सापडल्याची घटना ताजी असताना आज वसईत 150 हून अधिक मतदान ओळख पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे 15 तारखेला अगदी शांततेत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर संदेह निर्माण होत आहेत. कारण ह्या दोन्ही घटनामुळे नागरीक निवडणुकीच्या सदोष पद्धतीने पार पडल्या नाहीत याची ग्वाही देत आहेत.

आज सकाळी 11 च्या सुमारास वसईतील सनशाईन सिटी परिसरात एका नाल्याच्या बाजूला हे मतदान कार्ड सापडले आहेत. मातीच्या ढिगार्‍यात सापडलेले हे कार्ड मुंबईतील 168 चांदिवली मतदार संघातील नागरिकांची आहेत. सकाळी येथील स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. वासी तहसील कार्यालयाने ही मतदान कार्ड ताब्यात घेतली असून पुढील तपास करत आहे. सदरची कार्ड बोगस नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती नायब तहसीलदार पी.एस.भोईर यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2014 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close