S M L

होय, मीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत - पंकजा मुंडे

Samruddha Bhambure | Updated On: Oct 18, 2014 08:10 PM IST

होय, मीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत - पंकजा मुंडे

maxresdefault

18 ऑक्टोबर :  भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरू झालेल्या रेसमध्ये पंकजा मुंडे यांनीही उडी घेतली आहे. 'होय, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहे. पक्षाने माझ्यावर जर तशी जबाबदारी टाकली तर मी ती आनंदाने स्वीकारेन, असे पंकजा यांनी म्हटले आहे. प्रशासकीय अनुभवाचा प्रश्न त्यांनी टोलवून लावला आहे. तावडे, फडणवीस आणि मुनगंटीवार या तिघांना तरी कुठे प्रशासकीय अनुभव आहे, असा सवाल पंकजा यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आपघाती निधनानतंर जनतेचा मोठा पाठिंबा असलेल्या भाजपच्या नेत्या अशी ओळख तयार करण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी राज्यभरात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्या थेट जनतेच्या संपर्कात आल्या. राज्यात जर भाजप बहुमताने विजयी झालं तर भाजपचे नेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांच्यासह पंकजा मुंडे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बरोबरच्या दावेदार असणार आहेत.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी त्यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेला ठामपणे दुजोरा दिलाय. या जबाबदारीसाठी त्यांचा अनुभव कमी असल्याचे पंकजा यांच्या लक्षात आणून दिल्यावर, त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठीच्या इतर दावेदारांना देखील या मोठ्या जबाबदारीचा अनुभव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 'मला माहीत आहे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधील इतर नेते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. मात्र, मी देखील पहिल्यांदाच आमदार झालेली नाही. भाजप युवा मोर्चाची अध्यक्षा असताना मी राज्यभर फिरून तळागाळात जनसंपर्कवाढवला आहे. युतीच्या सरकारमध्ये फक्त एकनाथ खडसे यांनीच काम केले आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांनीतरी कुठे सरकारमध्ये काम केले आहे.' असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला.

पंकजा मुंडे यांचा ट्विट

दरम्यान, 'माझ्या आयुष्यात सर्वात जास्त कष्ट मी गेल्या काही दिवसांत घेतलेले आहेत. बाबा, उद्याच्या दिवसासाठी मला मनापासून आशिर्वाद द्या, बीडच्या 6 च्या 6 जागा मला जिंकून आणायच्या आहेत. माझ्या कष्टाचं चीज व्हावं असा आशिर्वाद मला द्या, असा भावनिक ट्विट पंकजा मुंडे यांनी आज केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2014 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close