S M L

पैलवान संजय पाटील खूनप्रकरणी उदयसिंह उंडाळकर निर्दोष

Samruddha Bhambure | Updated On: Oct 18, 2014 02:09 PM IST

पैलवान संजय पाटील खूनप्रकरणी उदयसिंह उंडाळकर निर्दोष

patil udaydada18 ऑक्टोबर : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकर-पाटील यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. उंडाळकर यांचा मुलगा उदयसिंह उंडाळकर-पाटील याची महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्याप्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणी एकूण 11 आरोपींपैकी 9 जणांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तब्बल सातवेळा विधानसभेवर निवडून आलेल्या उंडाळकर यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेल्याने उंडाळकर यांनी चव्हाण यांना आव्हान देत निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. मात्र, त्याआधी त्यांचा मुलाची निर्दोष सुटका झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून उदयसिंह उंडाळकर-पाटील तुरूंगात होते. 2009मध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची कराडमध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उदयसिंह यांना हत्येप्रकरणी आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2014 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close