S M L

निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रुफ जॅकेट्सचे पुरावे दिल्यास कारवाई करू - अशोक चव्हाण

4 जून बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी प्रकरणात विरोधकांनी काल केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोधकांनी पुरावे दिले तरच आम्ही कारवाई करू असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात या बुलेटप्रुफ जॅकेटची खरेदी 1992 ते 2002 या काळात झाली होती. या खरेदीनंतर आता 6 वर्षं उलटून गेली आहेत. सरकारी नियमाप्रमाणे सहा वर्षांपूर्वीच्या फाईल्स नष्ट करण्यात येतात. अशा नियमांवर बोट ठेवत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी बुधवारी विधानसभेत बुलेटप्रुफ जॅकेट आणलं होतं. हे जॅकेट केवळ 36 हजारात विकत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पण 26/11 च्या मुंबई हल्ल्यात जी जॅकेट्स मुंबई पोलिसांना देण्यात आली होती, ती 80 हजारात विकत घेतली होती, आणि तरीही त्यांचा दर्जा खराब होता. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्याचे पुरावे द्या असं म्हणत विरोधकांनी त्यांची मागणी टोलवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2009 02:09 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2009 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close