S M L

भाजपची जोरदार आघाडी, शिवसेना दुसर्‍या स्थानावर

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 05:52 PM IST

भाजपची जोरदार आघाडी, शिवसेना दुसर्‍या स्थानावर

bjp_news3419 ऑक्टोबर :: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 288 जागांचे निकाल हाती आले आहे. निकालात भाजपने जोरदार आघाडी घेतलीय. भाजप आणि महायुतीने आतापर्यंत 121 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने आतापर्यंत 110 जागांवर आघाडी घेतली आहे. तर घटकपक्षांनी 1 जागांची भर घातली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर बँण्ड पथक बोलावण्यात आले. तर शिवसेना दुसर्‍या स्थानावर आहे. शिवसेनेनं आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्यानंतर काँग्रेस तिसर्‍या स्थानावर आहे. काँग्रेसने 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचा नंबर लागला आहे. राष्ट्रवादीने 41 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मनसेचं इंजिन घसरलं असून 2 जागांवर आघाडीवर आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

लढाई विधानसभेची

एकूण मतदारसंघ 288

खुले मतदारसंघ - 234

अनुसूचित जातींसाठी राखीव - 29

अनुसूचित जमातींसाठी राखीव - 25

एकूण उमेदवार - 4119

भाजप - 280

काँग्रेस - 287

राष्ट्रवादी - 278

शिवसेना - 282

मनसे - 219

बसप - 260

सीपीआय - 34

सीपीएम - 19

इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष - 761

अपक्ष - 1699

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close