S M L

मनसेचं इंजिन घसरले, मुंबईतून बाहेर

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 04:55 PM IST

00raj_thakarey19 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालाय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मनसे केवळ 2 जागावर आघाडीवर आहे. मनसेचे जवळपास सर्वच शिलेदार पराभूत झाले आहे. मुंबईत जन्मलेली मनसे या पराभवामुळे मुंबईतूनच बाहेर फेकली गेली आहे. मुंबईत माहिममधून लढणारे नितीन सरदेसाई, शिवडीतून बाळा नांदगावकर पराभूत झाले आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रवीण दरेकरही पराभूत झाले आहे.

फक्त एका जागेनं मनसेची लाज राखली आहे. पुण्यात जुन्नर मतदारासंघात मनसेचे शरद सोनावणे विजयी झाले आहे. शरद सोनावणे 16,923 मतांनी विजयी झाले आहेत. शरद सोनावणे यांना 60 हजार 305 मत मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या आशा बुचके यांचा पराभव केला. आशा बुचके यांना 43 हजार 382 मत मिळाली. परंतु गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला 13 जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा मनसेला दुहेरी जागा ही गाठता आल्या नाहीत. गेल्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र यंदा लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मतदारांनी मनसेला सातवे आसमान दाखवले आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close