S M L

संसार पुन्हा थाटणार, उद्धवनी दिले युतीचे संकेत

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 04:19 PM IST

fadanvis_udhav_thackarey19 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपचा 25 वर्षांचा संसार जागावाटपावरुन मोडला पण आता जागांसाठी पुन्हा एकत्र येण्याची चिन्ह आहेत. मतमोजणीचा निकाल आता स्पष्ट झालाय.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजप आणि घटकपक्षांनी सर्वाधिक 111 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपने तब्बल 110 जागांवर मजल मारली आहे. मात्र भाजपला बहुमताने हुलकावणी दिली आहे. जो पक्ष महाराष्ट्राचा विकास करेल त्याला आपला पाठिंबा राहिल अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युती करण्याचे संकेत दिले आहे.

विशेष म्हणजे युती तुटण्यास उद्धव यांनी भाजपलाच जबाबदार धरले होते. भाजपवर उद्धव यांनी अफझल खान, उंदीर अशा शब्दात टीका केली होती. मात्र भाजपच्या नेत्यांनी बहुमतासाठी गरज जर पडली तर शिवसेनेचा पाठिंबा घेऊ असे जाहिरपणे व्यक्तव्य केलं होतं. आता परिस्थिती अपेक्षेप्रमाणे उद्भावली आहे त्यामुळे भाजप आणि सेनेचा संसार पुन्हा थाटतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close