S M L

....अन् राणे गहिवरले, नितेश राणेंना रडू कोसळलं

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 02:28 PM IST

....अन् राणे गहिवरले, नितेश राणेंना रडू कोसळलं

rane and son19 ऑक्टोबर : मतदारांनी दिलेला कौल मला मान्य असून माझा पराभव मी स्वीकारत आहे. तसंच माझा राजकीय अस्त होतानाच नितेश राणेचा झालेला उदय हा इतकाच महत्वाचा असल्याचं सांगत काँग्रेसचे नेते नारायण राणे गहिवरले.

पराभवानंतर कणकवली काँग्रेस कार्यलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंसोबत नितेश राणेंही उपस्थित होते. थांबणं हा तुमचा स्वभाव नाही. त्यामुळे पुढील राजकीय वाटचाल कशी असेल अस विचारलं असता याबाबत आपण येत्या आठ दिवसांत काय तो निर्णय घेणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलंय.

नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर 25,000 हुनही जास्त मतांनी कणकवलीतून निवडून आलेल्या आपल्या चिरंजीवाला शुभेच्छा देण्यासाठी नारायण राणेंनी नितेशला पुष्पगुच्छ दिला असता नितेश राणेंना रडू कोसळलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close