S M L

पराभवबंबाळ, माणिकराव ठाकरेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 19, 2014 03:56 PM IST

manikrao_sot19 ऑक्टोबर : अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा ही आज निकाल लागला. विधानसभेत झालेल्या पराभवाची जबाबदार स्वीकारात अखेर माणिकरावांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असं माणिकराव ठाकरे यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगलाचं दणका बसला आहे. ठाकरे म्हणाले, अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला नाही. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्याभरातून काँग्रेसचे जे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यांच्या तर्फे मी जनतेचे आभार मानतो. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य असून, जनतेच्या निर्णयानुसार आम्ही विरोधी पक्षात बसून काम करू असंही ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे निकालापूर्वीच पराभवाला कोण जबाबदार यावरून वादंग निर्माण झाल होता. काँग्रेसच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं होतं. पण आज चव्हाणांनी विजयी मिळवून पक्षातील विरोधकांना चपराक लगावलीये. परिणामी चव्हाणांच्या ऐवजी पहिला निकाल ठाकरेंचा लागला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close