S M L

काँग्रेसला धक्के पे धक्का, हर्षवर्धन पाटील पराभूत

Sachin Salve | Updated On: Oct 19, 2014 03:31 PM IST

89harshvardhan_patil19 ऑक्टोबर : काँग्रेसचे उमेदवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुण्यातील इंदापूर येथून निवडणूक लढवत होते. मात्र त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी तब्बल 15,177 मतांनी पाटील यांचा पराभव केला.

इंदापुरची लढत ही प्रतिष्ठेची लढत समजली जात होती. या लढतीत दत्ता भरणे यांनी 1,01,235 मत मिळवून आपला विजय निश्चित केला, तर पाटील यांना केवळ 86,058 मतांचीच मजल मारता आली. तसं पहायला गेल तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो.

पण आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसला याची किंमत मोजावी लागली. मागील विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांधिक 58 जागांपैकी 21 जागा पटकावल्या होत्या तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदाचे निकाल काय असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close