S M L

प्रीतम मुंडे 7 लाख विक्रमी मतांनी विजयी

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2014 03:42 PM IST

pritam munde beed19 ऑक्टोबर : लोकसभा पोटनिवडणुकीत बीडमधून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ.प्रीतम मुंडे 7 लाख मताधिक्यांनी विजयी झाल्यात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झाल्यामुळे इथली जागा रिक्त झाली होती.

या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी आपल्या जागी प्रीतम मुंडे यांच्या नावाची घोषणा केली होती. आज या लढतीचा निकाल लागला व प्रीतम मुंडे या विक्रमी मतांनी विजयी झाल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण गोपीनाथ मुंडेंना श्रद्धाजंली म्हणून प्रितम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं आधीच जाहीर केलं होतं.

तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. निकालानंतर बोलताना भावूक होऊन, ''पंकजाताईला राज्यात महत्त्वाची जबाबदारी मिळावी", अशी इच्छा प्रीतम यांनी व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2014 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close