S M L

सत्तेसाठी भाजप कोणाची साथ घेणार?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 20, 2014 02:30 PM IST

सत्तेसाठी भाजप कोणाची साथ घेणार?

bjp support

20 ऑक्टोबर : राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याबाबतचे चित्र सोमवारी म्हणजे आज बर्‍यापैकी स्पष्ट होण्याची आशा आहे. सत्तास्थापनेबाबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या विविध बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये पाठिंबा देणे आणि घेणे तसेच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपचे सर्व विजयी उमेदवार आज भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयात भेटणार आहे. आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार नसून, या बैठकीची तारीख आणि वेळ आम्ही योग्य वेळी जाहीर करू, असं भाजप नेते विनोद तावडे यांनी आज सांगितलं. हे सर्व विजयी उमेदवार आज विजयोत्सव साजरा करणार आहेत तसंच निवडणूक आयोगाच्या औपचारिकताही आज पूर्ण केल्या जाणार असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

288 आमदारांच्या विधानसभेत 122 जागा मिळवणारा भाजप शिवसेनेला पाठिंब्यासाठी प्रस्ताव पाठवेल की, राष्ट्रवादीने देऊ केलेला पाठिंब्याचा प्रस्ताव मान्य करेल, हे स्पष्ट झाल्यानंतरच सरकारबाबतची साशंकता दूर होणार आहे. राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे तर शिवसेना निमंत्रणाची किंवा प्रस्तावाची वाट पाहत आहे. पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या खेळीने शिवसेना या मुद्यावर काहीशी मागे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिवसेनलाही भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2014 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close