S M L

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2014 04:28 PM IST

ajit paawar20 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित आमदार अजित पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर आर.आर.पाटील यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी आणि जयदत्त क्षीरसागर यांची उपनेतेपदी निवड करण्यात आलीये. आज राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत सर्व नवनिर्वाचित आमदार आणि दिग्गज नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पराभवाची कारणांवर चर्चा झाली. तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड अजित पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांनी आपल्या निवडीवर पक्षाध्यक्षांचे आभार मानले. संख्या कमी झाली तरी जोमानं काम करू राज्यभर पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. तसंच राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा आणि आता काय करायचं हा समोरच्यांचा प्रश्न आहे असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आर.आर. पाटील यांची विधिमंडळात राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि जयदत्त क्षीरसागर यांची उपनेते निवड केल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीने रविवारी भाजपला न मागता पाठिंबा जाहीर केला. त्यावर भाजपने अजून जाहीररित्या तरी कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता पुढचं पाऊल काय टाकतं, याबद्दल उत्सुकता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2014 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close