S M L

'नोटा'चा दणका, भलेभले उमेदवार पडले तर काही काठावर वाचले !

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2014 07:36 PM IST

 'नोटा'चा दणका, भलेभले उमेदवार पडले तर काही काठावर वाचले !

20 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय मात्र अनेक उमेदवार काठावर पास झाले आणि याला कारणीभूत होतं 'नोटा' म्हणजेच 'यांपैकी कुणीही नाही' ('नॉन ऑफ द अबाऊ'). राज्यभरात जवळजवळ चार लाख 89 हजार मतदारांनी नोटाचा वापर केला. त्यामुळे अनेक उमेदवारांना फटका बसला. कोकण, गडचिरोली, कल्याण ग्रामीण आणि अहेरीमध्येही मतदारांनी नोटाचा वापर केल्याचं पाहण्यास मिळालं.

निवडणूक म्हटली तर आपल्यासमोर पर्याय येतात ते ज्या-ज्या पक्षातील उमेदवार उभे आहेत त्यापैकी कोणत्यातरी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं...मात्र यंदाच्या निवडणुकीत आणखी एक पर्याय मिळालाय आणि तो म्हणजे 'नोटा'चा पर्याय, म्हणजेच 'यांपैकी कोणी नाही' असा पर्याय निवडण्याचा. आणि याच पर्यायाचा वापर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. राज्यभरात जवळजवळ चार लाख 89 हजार मतदारांनी नोटाचा वापर केला. राज्यात सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 17 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. त्यामुळे या जिल्ह्यात नोटा तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर श्रीवर्धनमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा वापर केला. इथे राष्ट्रवादीचे अवधूत तटकरेंचा केवळ 77 मतांनी विजय झाला. तर शिवसेनेचे रवी मुंडे पराभूत झालेत.या ठिकाणी 3107 जणांनी नोटाला पसंती दिलीय. जर नोटाचा वापर केला गेला गेला नसता तर आजच चित्र कदाचित वेगळ दिसल असतं. त्याचप्रमाणे रायगडमधीलच उरण मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर 846 मतांनी विजयी झालेत,तर मागची तीन टर्म आमदार असलेल्या शेकापच्या विवेक पाटलांचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघात 995 नोटा वापरण्यात आलाय. तसंच रत्नागिरीतल्या दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम 3744 मतांनी विजयी झालेत त्यांनी तर पाच वेळा आमदार राहिलेल्या सुर्यकांत दळवींचा पराभव केला. या ठिकाणी 3339 नोटा वापरण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2014 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close