S M L

भाजप आमदारांच्या विजयी रॅलीत गँगस्टर

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2014 11:10 PM IST

भाजप आमदारांच्या विजयी रॅलीत गँगस्टर

santosh ambekar20 ऑक्टोबर : भाजपचे नागपूर मध्यचे विजयी उमेदवार विकास कुंभारे आणि नागपूर उत्तरचे विजयी उमेदवार डॉ. मिलिंद माने यांची विजयी रॅली निघाली होती. मात्र या रॅलीत कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर सहभागी झाल्यानं टीका होतेय. काहीच महिन्यांपूर्वी आंबेकर तुरुंगाबाहेर आलाय. त्याच्यावर यापूर्वी 2 वेळा मोक्काही लावण्यात आलाय. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. पण भाजपचा संतोष आंबेकरशी काही संबध नाही आणि तो अचानक विजयी मिरवणुकीत आल्याचं भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरिष व्यास यांचं म्हणणं आहे.

कोण आहे संतोष आंबेकर ?

गेल्या काही महिन्यांपुर्वीच संतोष आंबेकर तुरुंगाबाहेर आला आहे. संतोषवर दोन वेळा मोक्का लावण्यात आला होता. त्याच्या विरोधात 23 गुन्हे दाखल आहेत यात खून, अपहरण, खूनाचा प्रयत्न, जमिनीवर अवैध ताबा मिळवणे, फसवणूक या गुन्ह्याचा समावेश आहे. संतोष आंबेकरने 1999 मध्ये सराफा व्यापारी अनिल निनावे यांचा खून केल्याचा आरोप आहे तर 2011 मध्ये अनंता सोनी या प्रॉपर्टी डीलरच्या खूनातही संतोष आरोपी होता. गेल्या वर्षी संतोष आंबेकरने बिल्डर जितेंद्रसिंह चौहान यांना अंबाझरी पोलीस ठाण्यातच बंदुकीच्या धाकावर धमकावले होते. या प्रकरणात संतोष आंबेकर सहा महिने तुरुंगात होता याच प्रकरणात तो आता जामिनावर आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2014 11:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close