S M L

माणिकरावांनी फोडले चव्हाणांवर पराभवाचे खापर

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2014 07:23 PM IST

cm and manikrao21 ऑक्टोबर : पृथ्वीराज चव्हाण प्रचारात नव्हते, त्यांनी आर्थिक रसद दिली नाही, आमदारांची विकासकामं केली नाहीत अशा आरोपांची फैरी झाडत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पराभवाचे खापर फोडले आहे. याबद्दलचा अहवाल ठाकरेंनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.

गेली 15 वर्ष सत्ता सांभाळणार्‍या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसला मागील निवडणुकीपेक्षा यंदा 42 जागांवर समाधान मानावे लागले. हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, राजेंद्र दर्डा अशा दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. निकालाअगोदरच काँग्रेसमध्ये पराभवाला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार राहतील असा सूर उमटला होता. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमधून विजयी होत सडेतोड उत्तर दिले. पराभवाची जबाबदारी स्वीकारत माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण पराभवाचं खापर आज चव्हाण यांच्यावरच फोडण्यात आलंय. माणिकरावांनी पक्षश्रेष्ठींकडे प्राथमिक अहवाल पाठवलाय. यात पृथ्वीराज चव्हाणांवर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. चव्हाण प्रचारात नव्हते, त्यांनी आर्थिक रसद दिली नाही, आमदारांची विकासकामं केली नाहीत, पक्षसंघटनेला वेळ दिला नाही, प्रचार स्वतःच्या ताब्यात ठेवला, इतर नेत्यांशी समन्वय ठेवला नाही, अशी आरोपांची जंत्रीच या अहवालात मांडण्यात आलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close