S M L

नगरमध्ये पुन्हा दलित हत्याकांड, कुटुंबाची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2014 09:16 PM IST

नगरमध्ये पुन्हा दलित हत्याकांड, कुटुंबाची निर्घृण हत्या

nagar_dalit_muder21 ऑक्टोबर : एकीकडे दिवाळीच्या उत्सवात महाराष्ट्र न्हाऊन निघालाय मात्र दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा दलित कुटुंबीयांच्या हत्येनं काळिमा फासली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका दलित कुटुंबातील तिघांच्या मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडलीये. खुनाचे कारण आणि आरोपींची माहिती अजून मिळू शकली नाही.

अहमदनगर जिल्हा सोनई, नितीन आगे हत्याकांड प्रकरणातून झाकोळला जात नाही तेच पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या काळात दलित कुटुंबीयाचा हत्येची घटनासमोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखडे गावात सोमवारी रात्री ही घटना घडलीय. गावातील जाधव वस्तीत संजय जाधव,जयश्री जाधव आणि सुनील जाधव या तिघांचे हे कुटुंब राहते. आज सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे शेतात काम करणार्‍यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनी घरात पाहणी केली असता घरात कुणीही नव्हते. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबीयांचा शोध सुरू केला. पाथर्डीच्या शासकीय रुग्णालयात चौकशी केली असता तिथेही कोणीही दाखल झालं नसल्याचं कळालं. संध्याकाळी जाधव यांच्या घरापासून जवळच असलेल्या जुन्या विहिरीत ग्रामस्थांनी पाहणी केली असतात विहिरीत तिघांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. संजय जाधव, जयश्री जाधव आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव या 19 वर्षाच्या मुलाची हत्या केलीय. धारधार हत्याराने डोकं आणि हात शरीरापासून तोडून विहिरीत फेकून दिले. शेतीच्या वादातून हत्या झाल्याचा गावकर्‍यांचा संशय आहे. या मानवतेला काळिमा फासणार्‍या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतीय. या प्रकरणी अजून पोलिसांनी कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केले नाही. खुनाचे काय कारण होते हे अजून स्पष्ट झाले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close