S M L

विंडीजसोबत यापुढे भारत खेळणार नाही

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2014 11:30 PM IST

west india -india21 ऑक्टोबर : वेस्ट इंडीजची टीम भारताचा दौरा अर्धवट सोडून परत गेल्यानंतर बीसीसीआय आता वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे.

बीसीसीआयनं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबरोबरच्या सर्व सीरिज रद्द केल्यात. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय. वेतनाच्या मुद्द्यावरुन वेस्ट इंडिज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये वाद झाला होता.

त्यानंतर खेळाडूंनी दौरा अर्धवट सोडून परत जाण्याचा निर्णय घेतला. यावरुन बीसीसीआय नाराज झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 11:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close