S M L

शिवसेना नेत्यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 22, 2014 03:27 PM IST

शिवसेना नेत्यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट

Rajnath-Singh-m10687

22  ऑक्टोबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपच्या हालचालींना आता वेग आला असून, दिल्लीला गेलेले शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई मुंबईत परतले आहेत. त्यांनी शिवसेना भाजपला पाठिंबा देणार असल्याचं आश्वसन दिलं आहे.

हे दोन्ही शिवसेनेचे नेते आज सकाळी पुन्हा मुंबईत परतले. या दोघांनी महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नेमलेल्या राजनाथसिंह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे शिवसेना मवाळ धोरण स्वीकारत भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना भाजपला बिनशर्त पाठिंबा देत आहे. दरम्यान, हे दोघेही आज दुपारी उद्धव ठाकरेंना त्यांच्या दिल्ली वारीची माहिती देतील.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 123 जागा मिळाल्या असून, त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी 22 जणांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होण्याची जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, येत्या 26 तारखेला होणार्‍या पंतप्रधानांच्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे खासदारही जाणार आहेत. राज्यात सेना आणि भाजपची युती तुटल्यावर शिवसेना केंद्र सरकारमध्ये राहणार का, हा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता..त्यातच अवजड उद्योग मंत्री अनंत गीते राजीनामा देणार, अशा चर्चांनाही ऊत आला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close