S M L

शिवसेनेचे गटप्रमुख रमेश जाधव हत्येप्रकरणी 5 जण अटकेत

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2014 06:46 PM IST

98arrest22 ऑक्टोबर : मुंबईतील मालाड- दिंडोशी परिसरात मंगळवारी रात्री शिवसेनेचे गटप्रमुख रमेश जाधव यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी मीरा रोड येथून 5 जणांना अटक केली आहे.

रमेश जाधव यांच्या हत्येचे खोत डोंगरी परिसरात चांगलेच पडसाद उमटले आहेत. खोतडोंगरी परिसरातील लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली, तसंच हत्येच्या निषेधार्थ दुकानंही बंद ठेवली होती.

नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केलीये. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अटक झालेल्यांपैकी दोघेजण अट्टल गुन्हेगार असून रमेश जाधव त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत असल्यानंच त्यांची हत्या झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close