S M L

मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाला संघाकडून मान्यता?

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2014 07:42 PM IST

मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाला संघाकडून मान्यता?

devendra3422 ऑक्टोबर : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा अजूनही सुरुच आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत वरचढ ठरताना दिसत आहेत. संघ परिवाराची देवेंद्र यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 123 जागा जिंकून भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू केली. शिवसेनेसोबत एकीकडे चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत सुरू आहे. कालपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांनी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली. एवढेच नाहीतर आज गडकरींच्या मुख्यमंत्रिपदासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे या तिघांनीही गडकरींसाठी आमदारकी सोडण्याची तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे नेहमी नितीन गडकरींना संघाचा पाठिंबा राहिला आहे. मात्र आज अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर संघाने होकार दर्शवला आहे. संघाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केलीये, तसंच लहानपणापासून त्यांच्यावर संघाचे संस्कार आहेत. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हेही संघाचे कार्यकर्ते होते. ते जनसंघाकडून शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले होते. त्याशिवाय खुद्द देवेंद्र यांची अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमाही महत्त्वाची ठरू शकते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close