S M L

पाथर्डी दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करावी -आठवले

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2014 10:51 PM IST

ramdas athavale on joshi22 ऑक्टोबर : पाथर्डी दलित हत्याकांडाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलीय.पाथर्डीतल्या जवखेडे गावात सोमवारी तिहेरी हत्याकांड घडलं होतं. या गावाला आज रामदास आठवले आणि चंद्रकांत हंडोरेंनी भेट दिली. अहमदनगरला अत्याचारग्रस्त जिल्हा जाहीर करावा, अशी मागणीही आठवले यांनी केलीय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीच्या तालुक्यात एका दलित कुटुंबातल्या तिघांची निर्घूण हत्या करण्यात आलीय. सोमवारी रात्रीच्या दरम्यान जवखेडे गावात ही घटना घडलीय. यामध्ये संजय आणि जयश्री जाधव या दाम्पत्याची तर सुनील या 19 वर्षांच्या मुलाची हत्या केलीय. धारधार हत्याराने डोकं आणि हात शरीरापासून तोडून विहिरीत फेकून दिले. शेतीचा वाद आणि प्रेमप्रकरणातून या हत्या झाल्याचा गावकर्‍यांचा संशय आहे. मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतीय. दरम्यान, 48 तास उलटूनही या प्रकरणातले आरोपी फरार आहेत.

मुंबईत निदर्शनं

पाथर्डी हत्याकांडाच्या निषेधासाठी आज मुंबईतल्या विविध सामाजिक संघटना आणि दलित अत्याचार विरोधी कृती समिती यांच्या वतीने बुधवारी संध्याकाळी दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली. संपूर्ण मुंबईतून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. या घटनेतल्या दोषींवर तातडीनं कारवाई केली पाहिजे, अशी मागणी निदर्शकांनी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2014 10:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close