S M L

पाथर्डी दलित हत्याकांड : पीडितांच्या मृतदेहाचे आणखी अवयव सापडले

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2014 03:48 PM IST

nagar_dalit_muder23 ऑक्टोबर : पाथर्डी येथील दलित हत्याकांड प्रकरणातील जाधव कुटुंबीयांमधील सुनील जाधव यांच्या मृतदेहाचे काही अवयव तेथील बोअरवेलमध्ये सापडले आहेत. तसेच, डीएनए चाचणी करण्यासाठी काढलेल्या तीनही मृतदेहावर आज पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडली होती, त्या तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी घटनास्थळी म्हणजे जवखेडे खालसा गावाला भेट देऊन घटनेची पाहणी केली. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. मात्र अजूनही आरोपी कोण? व खुनाचे कारणही कळले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी रामदास आठवलेंनी केलीय. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशीही मागणी त्यांनी केलीय. पोलिसांनी लवकरात लवकर ठोस पुरावे शोधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी चंद्रकांत हंडोरे यांनी केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close