S M L

फडणवीस यांनी घेतली गडकरींची भेट

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2014 06:45 PM IST

फडणवीस यांनी घेतली गडकरींची भेट

fadnvis meet gadkari23 ऑक्टोबर : राज्यात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री कोण होणार ही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सगळ्यांचं लक्ष विदर्भाकडे लागलंय. मुख्यमंत्रिपदासाठी सगळ्यात जास्त चर्चेत नाव असलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये भेट घेतली.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट दिल्याचं बोललं जातंय. गडकरींना भेटण्यासाठी नागपूरमध्ये आमदार गेले त्यावेळेस फडणवीस उपस्थित नव्हते, त्यामुळे खूप चर्चा रंगली होती. दरम्यान, आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असं गडकरींनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close