S M L

पाथर्डी दलित हत्याकांड जाधव कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2014 03:30 PM IST

पाथर्डी दलित हत्याकांड जाधव कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार

23 ऑक्टोबर : अहमदनगरमधील पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी जाधव कुटुंबीयांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी जाधव यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील जमखेडा गावात सोमवारी रात्री जाधव कुटुंबातील तिन्ही सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तिघांच्या शरीरांच्या तुकडे करून विहिरीत फेकून दिले होते. तब्बल 3 दिवसांनंतर तिघांच्या मृतदेहांचे अवयव शोधण्याचं काम सुरू होतं.पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणार्‍या या घटनेनं राज्याला हादरावून सोडलं. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचं गावकर्‍यांचा संशय आहे. आज गुरुवारी दुपारी सुनील जाधव यांच्या मृतदेहाचे काही अवयव तेथील बोअरवेलमध्ये सापडले. दलित संघटनांनी जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र पोलिसांनी आश्वासनं दिल्यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलीय. मात्र चार दिवस उलटूनही आरोपी मात्र मोकाट आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close