S M L

युती नक्की होणार, शिवसेना खासदार अनिल देसाईंनी केलं स्पष्ट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 24, 2014 01:27 PM IST

युती नक्की होणार, शिवसेना खासदार अनिल देसाईंनी केलं स्पष्ट

24 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सरकारन स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे सर्व खासदार येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींतर्फे एनडीएच्या नेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनत सहभागी होणार आहे. पण उध्दव ठाकरे स्नेहभोजनाला जाणार का याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

शिवसेना आणि भाजप दोघांचाही उद्देश राज्यात स्थिर सरकार देणे हा असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे युती नक्की होईल, तसचं या स्नेहभोजनासाठी शिवसेनेचे सर्व खासदार हजर राहतील, असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांपर्यत या स्नेहभोजनाचं निमंत्रण पोहोचलं नव्हतं. त्यामुळे सेना- भाजपच्या सबंधांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, पण आता त्याला पूर्णविराम लागण्याचे चिन्ह आहेत.

दरम्यान, दिवाळी निमित्त सर्व भाजपनेते विजयोत्सवाचा आनंद घेण्यात सध्या मग्न आहेत. आता पुन्हा 26 तारखेनंतर राजकीय हालचालींना वेग येईल. 27 तारखेला मुंबईत भाजपच्या विधीमंडळपक्षाची बैठक होतेय. या बैठकीला केंद्रीय निरिक्षक येणार असून त्या बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला 27 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर संसदीय पक्षाचा नेता निवडल्यानंतर 28 ऑक्टोबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचं नावाला सर्वांची पसंती दिल्याचं बोलंल जातं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2014 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close