S M L

नितीन गडकरींनीही घेतली सरसंघचालकांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2014 01:23 PM IST

Gadkari

25 ऑक्टोबर :  नागपूरमधील संघ मुख्यालयात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं गडकरी म्हणाले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नवीन सरकारचा शपथविधी 28 तारखेला होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नेतानिवडीची जोरदार चर्चा सुरू आहे.  नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र!', असा नारा राज्यातील भाजप समसर्थकांकडून लावण्यात आला होता. राज्यात भाजपला नेतृत्त्व नाही, असे म्हटलं जात असलं तरी विधानसभा निवडणुकांची मुख्य जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीस यांच्याच खांद्यावर होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर 'राज्यात देवेंद्र' ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) रात्री उशिरा सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2014 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close